NVS Recruitment 2024
NVS Recruitment 2024 : नवोदय विद्यालय समिती मध्ये २०२४ भरती निघाली आहे ,या भरती साठी पदवीधर LLB ,१० वी पास ,१२ वी पास ,B.SC,B.TECH आणी ITI या पात्रतेवर भरती राबवली जाणार आहे.जर तुम्ही या पात्रातांपैकी कोणत्याही एक पात्रता निकष पूर्ण करत असाल ,तर तुम्हाला या नोकरीची सुवर्ण संधी आहे .या भरतीसाठी १४ पदे आहेत आणी या १४ पदांमध्ये १३७७ एवढ्या जागा आहेत .तास तर या भरतीमध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या जुनिअर सेक्रेत्रीअल असिस्तांत आणी मेस हेल्पर या पदासाठी आहेत .हि भरती वेगवेगळ्या पदांसाठी आहे ,आणी पदाच्या आवश्यकतेनुसार निकष हे वेगवेगळे आहेत .पण तरी सुध सगळ्यात जास्त अपडे हि १०वि १२वि पास असणार्या उमेदवारांसाठी आहे ,पण या १० वी १२वि च्या उमेदवारांना या शिक्षणासोबत ITI ,डिप्लोमा ,टायपिंग चे कोर्स झालेलं असणे आवश्यक आहे .नवोदय विद्यालय समिती कडून ह्या भरती साठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणी मुलाखतीच्या माध्यमातून पात्र उमेदवार यांची निवड करण्यात येईल .
या सर्व गोष्टींची माही आपण पुढे लेखामध्ये वाचणार आहोत ,सोबतच इतर काही महत्वाच्या बाबी लेखांमध्ये नमूद केले गेले आहेत .पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलीन पद्धतीने अर्ज करायचा आहे ,तो अर्ज त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून करायचा आहे ,त्याच्या व्यतिरिक्त कसल्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .ऑफलाईन अर्ज जर का सादर केला गेला उमेदवारांकडून तर तो ग्राह्य धरला जाणार नाही .
NVS Recruitment 2024 : या भरतीमध्ये निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांची नोकरी हि कायमस्वरूपी नसणार आहे .नोकरीचा कालावधी कमी जास्त होईल ,त्यासाठी या सर्व बाबतचे अधिकार हे नवोदय समितीकडेच असणार आहेत .निवड झालेल्या उमेदवाराला त्या त्या रिक्त जागेवर कायमस्वरूपी ठेवायचे का नाही हे त्या त्या उमेदवारावर अवलंबून असणार आहे .जर उमेदवार हा चांगल्या प्रकारे काम करेल टिकून राहण्याचा प्रयत्न करेल तेवढे चांगले होईल.जर का उमेदवार नित काम नाही करेल खराब काम करेल तर त्याला कोणत्याही क्षणी बिगर नीतीस देऊन कामावरून काढण्याचा अधिकार ही नवोदय समितीकडे असेल .
- भरतीचे नाव : Navoday Vidhyalay Samiti Bharti 2024
- एकूण पदे : 14 पदे आहेत.
- पदांचे नावे : पदांची नावे खाली पदांच्या माहिती मध्ये दिले गेले आहेत.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
- वेतनमान : 63,200 रुपये प्रति महिना ( वेतनमान पदा नुसार वेगवेगळी आहेत )
- वयाची अट : 18 ते 40 वर्षे ( पदा नुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे )
- परीक्षा फी : 1000-1500 रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांना 500 रुपये आहे )
NVS Recruitment 2024 या भरतीमधील पदांची नावे आणी रिक्त जागा याची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे :
या भरती मध्ये १४ पदे उपलब्ध आहेत ज्यामध्ये १३७७ जागा ह्या रिक्त आहेत पुढीलप्रमाणे .
- स्टाफ नर्स ( महिला , Group-B ) : १२१ रिक्त जागा .
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर ( Group-B ) : ०५ रिक्त जागा
- ऑडिट असिस्टंट ( Group-B ) : १२ रिक्त जागा .
- ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर ( Group-B ) : ०४ रिक्त जागा
- लीगल असिस्टंट ( Group-B ) : ०१
- स्टेनोग्राफर ( Group-B ) : २३ रिक्त जागा
- कॉम्प्युटर ऑपरेटर ( Group-C ) : ०२ रिक्त जागा
- कॅटरिंग सुपरवाइजर ( Group-C ) : ७८ रिक्त जागा
- ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट ( HQ/RO Cadre ) : २१ रिक्त जागा
- ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट ( JNV Cadre ) : ३६० रिक्त जागा
- इलेक्ट्रिशियन कम प्लंबर ( Group-C ) : १२८ रिक्त जागा
- लॅब अटेंडंट ( Group-C ) : १६१ रिक्त जागा
- मेस हेल्पर ( Group-C ) : ४४२ रिक्त जागा
- मल्टी टास्किंग स्टाफ ( Group-C ) : १९ रिक्त जागा
- Total : १३७७ एकूण रिक्त जागा .
नवोदय विद्यालय समिती भरती २०२४ या भरती साठी शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 स्टाफ नर्स :
(i) B.Sc (Hons.)Nursing किंवा B.Sc (Nursing)
(ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र. 2 असिस्टंट सेक्शन ऑफिसर :
(i) पदवीधर
(ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 3 ऑडिट असिस्टंट : B.Com
पद क्र. 4 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर :
(i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी
(ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र. 5 लीगल असिस्टंट :
- LLB
(ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 6 स्टेनोग्राफर :
- 12वी उत्तीर्ण
(ii) डिक्टेशन : 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
पद क्र. 7 कॉम्प्युटर ऑपरेटर : BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
पद क्र. 8 कॅटरिंग सुपरवाइजर : हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
पद क्र. 9 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट : 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
पद क्र. 10 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट : 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
पद क्र. 11 इलेक्ट्रिशियन कम प्लंबर :
- 10वी उत्तीर्ण
- ITI (Electrician/Wireman)
- 02 वर्षे अनुभव
पद क्र. 12 लॅब अटेंडंट : 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र. 13 मेस हेल्पर :
- 10वी उत्तीर्ण
(ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र. 14 मल्टी टास्किंग स्टाफ : 10वी उत्तीर्ण
पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहेत ,यामध्ये सगळ्यात जास्त रिक्त जागा १०वि १२ वी व ITI,डिप्लोमा यावर राबवल्या जाणार आहेत .तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करावयाचा त्या पदासाठी कोणते निकष लावण्यात आलेले आहेत ते तपासून काळजीपूर्वक पहा याची माहिती जाणून घेणे अत्यावश्यक आहे .
NVS Recruitment 2024 या भरती साठी वयोमर्यादा :
वयोमर्यादा मधेही पदानुसार निकष भिन्न आहेत.
या भरती मध्ये सर्व पदासाठी किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे . तर कमाल वयोमर्यादा हि वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी आहे .
वायोमार्यादाच्या नियमामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना सुट देण्यात आलेली आहे , SC ,ST या प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे .तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सुत देण्यात आलेली आहे.
- पद क्र. 1 आणी 8 यासाठी : 35 वर्षांपर्यंत
- पद क्र. 2 : 23 ते 33 वर्षे
- पद क्र. 3, 7, 12, 13 आणी 14 : 18 ते 30 वर्षे
- पद क्र. 4 : 32 वर्षांपर्यंत
- पद क्र. 5 : 23 ते 35 वर्षे
- पद क्र. 6, 9, आणी 10 : 18 ते 27 वर्षे
- पद क्र. 11 : 18 ते 40 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची दिनांक : 24 मार्च 2024
- अर्ज बंद होण्याची दिनांक : 30 एप्रिल 2024
NVS Recruitment 2024 या भरती साठी अर्ज प्रक्रिया आणी काही माहिती :
- या भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी उमेदवारास अधिकृत संकेतस्थळावर वर जाऊन फॉर्म भरायचा आहे.
- तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत संकेत्स्थाल मधून ऑनलाईन अर्ज करा
- अधिकृत संकेत्थालावर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक शोधा, आणि त्यावर क्लिक करून फॉर्म ओपन पहा आणी भरून सादर करा.
- फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील .
- अर्ज करण्यापुर्वी पात्र उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवाराला प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागणार आहे .
- अर्ज हा काही दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अर्ज 24 मार्च 2024 रोजी सुरु झाले आहेत .
- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 30 एप्रिल 2024 आहे .
- अर्जाची फी भरणे अनिवार्य आहे.
- एकदा पाठवलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत माघारी दिले जाणार नाही
- ओपन आणि ओबीसी प्रवर्गातील पद ०१ साठी १५०० रुपये भरायचे आहे, तर पद ०२ ते १४ करिता १००० रुपये भरावायाचे आहे. बाकी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये फी भरावयाची आहे.
- फी भरून झाल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म सादर करू शकता,आणी एकदा अर्ज सबमिट झाला की तो नवोदय विद्यालय समिती कडे सादर होईल, आणि तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होते .
अधिकृत संकेतस्थळ : https://navodaya.gov.in/nvs/en/Home1#
जाहिरात डाऊनलोड करा : https://prigovjobs.com/wp-content/uploads/2024/03/NVS_Bharti_2024.pdf
ऑनलाईन अर्ज येथून करा : https://navodaya.gov.in/nvs/en/Recruitment/Notification-Vacancies/
नवोदय विद्यालय समिती भरती २०२४ या भरती साठी निवड प्रक्रिया :
- नवोदय विद्यालय समिती भरती २०२४ या भरती मध्ये पात्र उमेदवारांची निवड हि ,मेरीट लिस्ट अनुसार केली जाणार आहे .
- या भरती साठी सर्वात आधी लेखी परीक्षा घेतली जाईल त्यामध्ये १\4 अशी नेगेतीव मार्किंग सिस्टम असणार आहे .
- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुलाखतीकरिता पात्र असणार आहेत .नंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे ,लेखी परीक्षा आणी मुलाखत या दोन्ही चे मार्क एकत्रित करून मेरीट लिस्ट काढली जाईल ,त्या लिस्ट जे उमेदवार येतील ,त्या उमेदवारांची निवड रिक्त पदाच्या रिक्त जगासाठी केली जाईल .
नवोदय विद्यालय समिती भरती २०२४ थोडक्यात आढावा :
- नवोदय विद्यालय समिती भरती २०२४ साठी एकूण पदे आणी रिक्त जागा किती आहेत ?
या भरती मध्ये एकूण पदे १४ आहेत आणी त्यामध्ये एकूण रिक्त जागा १३७७ आहेत .
- नवोदय विद्यालय समिती भरती २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे ?
नवोदय विद्यालय समिती भरती २०२४ साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- नवोदय विद्यालय समिती भरती २०२४ साठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक किती आहे ?
नवोदय विद्यालय समिती भरती २०२४ साठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० एप्रिल २०२४ हि आहे . या तारखेच्या आधीच अर्ज करायचे आहे .मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही हे लक्षात घ्यावे .
अधिक लेख वाचा :
12 वी उत्तीर्ण महावितरण भरती २०२४
महाराष्ट्र पोलीस मेगा भरती २०२४